हिंगोलीत पोलिस असल्याचे सांगत एका व्यापाऱ्यास लुटले

 हिंगोलीत पोलिस असल्याचे सांगत  व्यापाऱ्यास लुटले

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
23जून 2025
हिंगोली : पोलिस असल्याचे  सांगत 
करून दोन भामट्यांनी एका व्यापाऱ्याजवळील सोन्याची अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन पळवून नेली. ही घटना हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागातील गणेशवाडी शाळेजवळ २१ जून रोजी घडली. याप्रकरणी भामट्यांविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.
हिंगोली शहरातील यशवंतनगरातील व्यापारी गिरीश रूखोबा यरमळ हे २१ जून रोजी दुचाकीवरून घरी जात होते. गणेशवाडी शाळेजवळ आले असता पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना आवाज देऊन थांबवले. आम्ही पोलिस असून या भागात काल गांजाची रेड झाली आहे. यात एका व्यक्तीला चाकू लागला असून, तुम्ही अंगठी व चेन काढून ठेवा

सोन्याची अंगठी व चेन भामट्यांनी केली लंपास

असे त्यांनी येरमळ यांना सांगितले. येरमळ यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून हातातील ८.८ ग्रॅम वजनाची अंगठी व दोन तोळे १ ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चेन काढली. यावेळी भामट्यांनी अंगठी व चेन रुमालामध्ये ठेवल्याचे दाखवत रुमालाची घडी करून येरमळ यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवून दिली. त्यानंतर भामट्यांनी तिथून काढता पाय घेतला. दरम्यान, येरमळ यांना संशय आल्याने त्यांनी दुचाकीची डिक्की उघडून बघितले असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, सहायक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे  . परगेवार, जमादार . धामणे, . क्षीरसागर, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, संजय मार्के, विलास वडकुते यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
आरोपींना लवकरच बेड्या ठोकू 
असे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला बोलताना सांगितले 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने