ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठे यश
डॉ. सलीम झकेरिया उर्दू हायस्कूला सेनगाव न्यायालयाकडून मनाई हुकुमचा आदेश
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
05जुलै 2025
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील
डॉ. सलीम झकेरिया उर्दू हायस्कूल, या शाळेच्या शांततामय ताब्यात अडथळा आणणाऱ्यांना सेनगावच्या माननीय विद्यमान दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांनी मोठा झटका देत तात्पुरता मनाई हुकुम दिला आहे. या आदेशामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचले असून, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
पुसेगाव ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता क्र. 1192, एकूण 10,000 चौ.फुट क्षेत्रफळावर डॉ. सलीम झकेरिया उर्दू हायस्कूल ही शाळ असून त्यातील 2,500 चौ.फुट क्षेत्रात R.C.C. इमारत उभारलेली आहे. काही स्थानिकांनी या जागेवरील शाळेचा ताबा बळकावण्याचा प्रयत्न केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यामुळे शाळेचे विश्वस्त आणि प्राचार्य यांनी अॅड. अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या माध्यमातून विद्यमान दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर सेनगाव यांच्या न्यायलयात दिवाणी दावा क्र. ६९/२०२५ दाखल करून त्यामध्ये तात्पुरत्या मनाई आदेशाची मागणी केली होती.
तरी विद्यमान दिवानी न्यायधीश श्री एस. ऐस. जैस्वाल यानी दि 30/06/2025 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद एकुन शाळेचा तात्पुरत्या मनाई हुकुमचा अर्ज मंजुर केला
माननीय न्यायालयाने आदेशात स्पष्ट नमूद केले की –
"प्रतिवादी, त्यांचे सेवक, एजंट अथवा त्यांच्यावतीने कोणतीही व्यक्ती, दावा निकाली निघेपर्यंत वरील मालमत्तेवरील (गट नं. 1192, क्षेत्रफळ 10,000 चौ.फुट व आर.सी.सी. 2,500 चौ.फुट) शाळेच्या ताब्यात अडथळा आणू नये किंवा त्यांना ताब्यातून बेदखल करू नये.
या आदेशामुळे शाळेच्या व्यवस्थापनाला आणि विशेषतः विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही महत्त्वपूर्ण कायदेशीर विजय अॅड. देशमुख यांच्या प्रभावी कामगिरीमुळे शक्य झाला आहे. या निकालामुळे भविष्यातील शिक्षण सुरळीतपणे सुरू राहणार असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा आदेश मैलाचा दगड ठरणार आहे.
शाळेचे विश्वस्त व मुख्याध्यापक यांच्या ॲड.सतिष देशमुख, ॲड. ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा