हिंगोलीत एनटीसी भागात विज जोडणी करताना कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू – जिओ कंपनीवर गुन्हा दाखल होणार

हिंगोलीत एनटीसी भागात विज जोडणी करताना कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू – जिओ कंपनीवर गुन्हा दाखल होणार

हिंगोली, ता. १६ सप्टेंबर (प्रतिनिधी)
हिंगोली शहरातील एनटीसी परिसरात विज जोडणीच्या कामादरम्यान झालेल्या शॉर्टसर्किटमुळे एका कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. मृत कामगाराचे नाव रितिक टेकाम असे असून, तो विज जोडणी करत असताना अचानक विजेचा झटका लागून विद्युत खांबावरच लटकलेल्या अवस्थेत मृत्यूमुखी पडला. ही धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास घडली.

जिओ कार्यालयातून सुरु होता विज पुरवठा
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, एनटीसी परिसरातील जिओ कंपनीच्या कार्यालयातून विज पुरवठा सुरू होता. रितिक टेकाम हा विज जोडणीचं काम करत असताना अचानक शॉर्टसर्किट झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे इंजिनीयर बेलसरे यांनी माहिती देताना सांगितले की, संबंधित ठिकाणी योग्य पद्धतीने विज  पुरवठा बंद केला  होता  मात्र  जिओ कंपनीच्या ऑफिसमधून  अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने हा अपघात घडला.

हिंगोली शहरात 

 तीन तास वीज खंडित करून मृतदेह खाली उतरवला
घटनेनंतर परिसरातील वीज तीन तास बंद करण्यात आली होती. मृतदेह चक्क दोन तासांपर्यंत विद्युत पोलवर लटकलेला होता. त्यानंतर हिंगोली शहर पोलिस निरीक्षक संदीप मोदे, सहायक पोलीस निरीक्षक संगम   परगेवार संजय संजय मार्के अमजद शेख मुजीब शेख  अझर पठाण संतोष करे  यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या सहाय्याने मृतदेह विद्युत खांबावरून खाली उतरवण्यात आला.

जिओ कंपनीवर गुन्हा दाखल होणार
या प्रकरणात इंजिनीयर बेलसरे यांनी जिओ कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करत, कंपनीवर गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले. तसेच पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांनी महाराष्ट्र 24 न्यूजशी बोलताना सांगितले की, मृतदेहाची उत्तरीय तपासणी (पोस्टमार्टम) झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल.

घटनेमुळे परिसरात खळबळ – मोठी नागरिकांची गर्दी
ही घटना एनटीसी परिसरात घडल्याने स्थानिक नागरिकांत एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात ठेवत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कार्यवाही सुरू केली.

पोलिस तपास सुरु असून, मृत्यूमागील नेमकी कारणे शोधली जात आहेत.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने