हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गणेशोत्सव उत्साहात साजरापत्रकार सुधाकर वाढवे व डॉ. बालाजी भाकरे यांना आरतीचा मान

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा
पत्रकार सुधाकर वाढवे व डॉ. बालाजी भाकरे यांना आरतीचा मान

 आज महाप्रसाद व लेझीम-ढोल पथकासह विसर्जन मिरवणूक  
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
5 सप्टेंबर 2025 
हिंगोली (प्रतिनिधी)
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात यंदाचा गणेशोत्सव अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होत असून, धार्मिकतेसोबतच सामाजिक उत्तरदायित्वाचाही भक्कम प्रत्यय देणारे उपक्रम राबवण्यात येत आहेत.

श्रीगणेशाच्या आरतीसाठी यावेळी पत्रकार सुधाकर वाढवे आणि डॉ. बालाजी भाकरे यांना मानाचा आरतीचा मान देण्यात आला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात संपूर्ण पोलीस ठाणे भक्तीमय वातावरणात न्हालं.

अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

आरतीवेळी ठाणेदार श्यामकुमार डोंगरे, पोलीस निरीक्षक राहुल घुले, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष वाठोरे, तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

उपस्थित इतर अंमलदारांमध्ये
पोह. खोडवे, चिभडे, जाधव, नागरगोजे, जमदाडे, पंडितकर, पोना. गायकवाड, चव्हाण, पोशी. धुमाळे, सांगळे, क्षीरसागर, खोकले, अन्नदाते, राठोड, लांडगे यांचा समावेश होता. महिला पोलीस कर्मचार्‍यांनीही या आरतीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने