धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी रामदास पाटील सुमठाणकर मैदानात!
लेंडी-मन्याड जनसेवा कार्यालयाचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
देगलूर तुकाराम नगरी येथे लेंडी-मन्याड जनसेवा कार्यालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचा मोठ्या उत्साहात व धर्मशील वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास शिवाचार्य महाराजांचे थोर सानिध्य लाभले. सोबतच खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजसेवेचे नवयुग सुरू!
रामदास पाटील सुमठाणकर यांच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेले हे कार्यालय शेतकरी, गोरगरीब, वंचित आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांचे निराकरण करणारे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.
या कार्यालयाच्या स्थापनेमागे समाजातील विविध स्तरांतील समस्यांना समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे हा प्रमुख उद्देश असल्याचे सुमठाणकर यांनी सांगितले.
धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष
शुभारंभ प्रसंगी बोलताना अनेक मान्यवरांनी सुमठाणकर यांच्या कार्याची स्तुती केली.
धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्याचार्फत सुरू करण्यात आलेल्या हालचालींना सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत असून, समाजात नवा आशावाद निर्माण झाला आहे.
"शासकीय सेवेहून समाजसेवा श्रेष्ठ" – सुमठाणकर
सेवानिवृत्त सनदी अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर म्हणाले,
"हिंगोली नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर काम करताना जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. आता शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहण्याचा संकल्प केला आहे."
आपल्या भूमीने घडवले, शिक्षण व संधी दिली, त्याचे ऋण फेडण्यासाठीच हे कार्यालय स्थापन केले असल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले.
सर्वसामान्यांसाठी सशक्त व्यासपीठ
लेंडी-मन्याड जनसेवा कार्यालयामुळे देगलूर परिसरातील नागरिकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व सोडविण्यासाठी नवे व सशक्त व्यासपीठ मिळाले आहे.
या उपक्रमातून समाजसेवेचे नवे पर्व सुरू झाले असून, नागरिकांमध्ये याविषयी समाधान व आशा व्यक्त केली जात आहे.
ही एक सामाजिक बांधिलकीची नवी दिशा असून, या कार्यास संपूर्ण जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा