हिंगोली जिल्हा परिषद सीईओ अंजली रमेश यांची तडकाफडकी बदली
राज्य सरकारकडून उच्चस्तरीय प्रशासनिक फेरबदल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क | 18 नोव्हेंबर 2025
महाराष्ट्र शासनाने १८ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या महत्वाच्या आदेशानुसार राज्य प्रशासनातील अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नवीन नेमणुका करण्यात आल्या आहेत. या फेरबदलात हिंगोली जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश (IAS:RR:2020) यांची तडकाफडकी बदली करून त्यांना आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर या महत्वाच्या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
राज्यातील विविध निगम, महामंडळे आणि संशोधन संस्थांमध्येही अनुभवी आयएएस अधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती करण्यात आली असून, बदल्यांची ही मालिका प्रशासनात चैतन्य आणणारी ठरत आहे.
बदल्यांचे तपशील :
1. राहुल रंजन महिवाल (IAS:RR:2005)
यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती.
2. प्रकाश खपले (IAS:SCS:2013)
सध्याचे आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी बदली.
3. डॉ. मंजिरी मानोलकर (IAS:SCS:2016)
विद्यमान व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे नियुक्ती.
4. त्रिगुण कुलकर्णी (IAS:SCS:2016)
उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची अध्यक्ष, SSC आणि HSC बोर्ड, पुणे या महत्वाच्या शैक्षणिक पदावर नियुक्ती.
5. अंजली रमेश (IAS:RR:2020)
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांची आयुक्त, मृदा आणि जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर म्हणून नियुक्ती.
हिंगोलीतील प्रशासनावर परिणाम
हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत विविध विकास कामांना वेग मिळवून दिल्यानंतर आलेली अंजली रमेश यांची ही तडकाफडकी बदली प्रशासनातील हालचालींना नवी दिशा देणारी ठरत आहे. त्यांच्या कार्यकाळात पाणीपुरवठा, ग्रामीण रस्ते, शिक्षण तसेच डिजिटल प्रशासन या क्षेत्रांत अनेक उपक्रम राबविण्यात आले होते.
मृदा आणि जलसंधारण विभागात त्यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे, कारण राज्यातील जलसंधारण प्रकल्पांच्या गतीला चालना देण्याची जबाबदारी या विभागावर असते.
राज्य प्रशासनात नवीन समीकरणे
या फेरबदलामुळे कृषी, मत्स्य, आदिवासी संशोधन, शैक्षणिक मंडळे आणि जलसंधारण या विविध विभागांना नवे नेतृत्व मिळाले आहे. अनुभवी अधिकाऱ्यांच्या या नेमणुकांमुळे आगामी काळात धोरणात्मक निर्णय प्रक्रियेला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे आदेश दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:४१ वाजता जारी करण्यात आले.
वरिष्ठ अधिकारी
हिंगोली जिल्हा परिषदचा पदभार प्रकल्प अधिकारी नामदेव केंद्र यांच्याकडे देण्यात आला आहे
टिप्पणी पोस्ट करा