कुऱ्हाडी येथे आरोग्य वर्धिनी कार्यक्रम 89 लाभार्थ्यांची तपासणी
कुऱ्हाडी :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ॲनिमिया मुक्त भारत (AMB) योजनेचा प्रभावी जनजागृती उपक्रम म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र येलदरी व आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पिंपळगाव (का.) यांच्या संयुक्त विद्यमाने कुऱ्हाडी येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 10 वर्षांवरील किशोरवयीन मुली, महिला, गरोदर माता व स्तनदा मातांची रक्त चाचणी, बीपी, शुगर तपासणी अशा सर्वांगीण आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
या उपक्रमात एकूण 82 लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना आवश्यक ती वैद्यकीय माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.
कार्यक्रमाला कुऱ्हाडी गावचे मा. सरपंच रामकोर गोविंद राठोड यांनी विशेष सहकार्य केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येलदरी येथील आरोग्य सहाय्यक श्री. सी. एन. पुंडगे, उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विजय रहाटे, आरोग्य सेवक श्री. मिलिंद लाटे, आरोग्य सेविका सौ. ठाकरे, आशा कार्यकर्ती स्वाती नेवरे, शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच अंगणवाडी सेविका भारती वाहुळे यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवण्यासाठी मोलाची साथ दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महा लॅबचे श्री. शेख व श्री. अशोक वाकळे यांचेही विशेष सहकार्य लाभले.
या आरोग्य वर्धिनी उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढून ग्रामीण भागात आरोग्यसेवा प्रभावीपणे पोहोचवण्यास मोठी मदत झाली.
टिप्पणी पोस्ट करा