हिंगोली जिल्हा : हिंगोली जिल्हा वकील संघाच्या सन 2026–27 या कालावधीसाठी होणाऱ्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे आज संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वकील संघाचे नेतृत्व कोणाकडे जाणार यावर न्यायालयीन प्रशासन, वकीलांचे हक्क व वकील संघाची पुढील दिशा अवलंबून असल्याने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
मतदान दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत होणार असून मतदान पूर्ण होताच मतदान आयोग तात्काळ निकाल जाहीर करणार आहे.
अॅड. एम. एन. कदम हे अनुभवी, प्रामाणिक आणि सर्वसामान्य वकिलांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. संघटनेत पारदर्शकता, वकीलांच्या समस्या, तरुण वकिलांना संधी व बार असोसिएशनची प्रतिमा उंचावण्याचे त्यांचे ध्येय आहे.
या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सर्व वकील बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, आपले एक मौल्यवान मत हिंगोली जिल्हा वकील संघाच्या विकासासाठी वापरा आणि अध्यक्ष पदासाठी अॅड. एम. एन. कदम यांना बहुमताने विजयी करा.
एक मत – मजबूत वकील संघासाठी,
एक मत – उज्ज्वल भविष्यासाठी!
असा प्रतिसाद हिंगोली जिल्हा वकील संघाच्या सदस्या कडून होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा