अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
26 एप्रिल 2026
हिंगोली : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या तसेच अॅट्रॉसिटीसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची घटना समोर आली आहे.
सदर प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस स्टेशन बासंबा, ता. जि. हिंगोली येथे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता.
या तक्रारीवरून पोलीस स्टेशन बासंबा येथे गुन्हा क्रमांक 64/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पीडिता मिळून आल्यानंतर तिचा जबाब नोंदविण्यात आला व प्रकरणात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4 व 8 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 मधील कलम 3(1)(w)(i)(ii), 3(2)(5), 3(2)(va) यांचा समावेश करण्यात आला.
या प्रकरणातील अटक आरोपी वैभव विठ्ठल सातव याने जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे अॅड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एन. माने यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीस जामीन मंजूर केला.
आरोपीच्या वतीने अॅड. सतीश देशमुख, अॅड. शामकांत देशमुख, अॅड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. शरद देशमुख, अॅड. अदित ऊर्फ शुभम देशमुख, अॅड. राहुल देशमुख, अॅड. योगेश खिल्लारी (पाटील), अॅड. रजत देशमुख, अॅड. प्रकाश मगरे, अॅड. सुमित सातव, अॅड. आनंद खिल्लारे, अॅड. अविनाश राठोड, अॅड. मुदस्सीर अ. रहिम, अॅड. आकाश चव्हाण, अॅड. श्रद्धा जैस्वाल, अॅड. लखन पठाडे, अॅड. गजानन घुगे, अॅड. सुमित कदम, अॅड. तुषार देशमुख, अॅड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस, अॅड. सचिन सोनुने, अॅड. संदीप डवले, अॅड. शिवम देशमुख, अॅड. प्रिया कुरील, अॅड. हरपालसिंग सेठी, अॅड. महावीर सिंग चौहान आदींनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा