कळमनुरीत तरुणाचा दगडाने ठेचून खून; सहा जणांविरुद्ध गुन्हा, चौघांना अटक

कळमनुरीत तरुणाचा दगडाने ठेचून खून; सहा जणांविरुद्ध गुन्हा, चौघांना अटक

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
कळमनुरी, दि. 24 मे 2026 : शहरातील साईनगर परिसरात शुक्रवारी रात्री जुन्या वादातून 23 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणाचे नाव नवनाथ शिवाजी बेद्रे (वय 23, रा. पाटील गल्ली, कळमनुरी) असे आहे. याप्रकरणी त्याचे वडील शिवाजी ग्यानबाराव बेद्रे (वय 45) यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना दि. 23 मे 2026 रोजी रात्री सुमारे 8.40 वाजण्याच्या सुमारास साईनगर येथील कपील बारच्या बाजूला असलेल्या रेतीच्या ढिगाजवळ घडली. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून नवनाथ बेद्रे याला जिवे मारण्याचा कट रचला. त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड मारून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
dysp कुंदन कुमार वाघमारे यांनी घटनास्थळी पाहणी केली सोबत psi नानाराव पोले यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते
या प्रकरणी पोलिसांनी भा.न्य.सं. कलम 103(1), 61(2) अन्वये गुन्हा क्रमांक 240/2026 दाखल केला आहे.
पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे :
1) अमर बबनराव शिंदे (27)
2) परमेश्वर उर्फ बंटी हरीभाऊ जाधव (30)
3) भारत शंकरलाल यादव (25)
4) दुर्गेश लक्ष्मणराव गाभणे (25)
5) आकाश विठ्ठलराव सातव (28)
6) सुरेश विठ्ठलराव सातव (35)
सर्व रा. कळमनुरी, जि. हिंगोली.
यापैकी आरोपी क्रमांक 1, 2, 4 आणि 6 यांना पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निलाभ रोहन. उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे  हिंगोली शहर, पोलीस निरीक्षक माकोडे तसेच सपोनि इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि इंगळे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने