बासंबा येथे विहीर खोदकामादरम्यान ब्लास्टिंग; सालगडी कुटुंब थोडक्यात बचावले
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
23 मे 2026
अकोला रोडलगत अन्नपूर्णा शाळेजवळील घटना; जनावरे जखमी, शेतकऱ्यांच्या शेडचे मोठे नुकसान
बासंबा, ता.___ : बासंबा-कलगाव अकोला रोडलगत अन्नपूर्णा शाळेजवळ सुरू असलेल्या विहीर खोदकामादरम्यान झालेल्या ब्लास्टिंगमुळे मोठी दुर्घटना टळली. आज दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गट क्रमांक 87/88 मधील शेतकऱ्यांचे नुकसान झाले अन्नपूर्णा शाळेजवळ
शेतात विहीर खोदकामाचे काम सुरू असताना अचानक ब्लास्टिंग करण्यात आले. या ब्लास्टिंगमधून उडालेले दगड जवळील पोले यांच्या शेतातील कोठ्यावर जाऊन पडले. त्या ठिकाणी सालगडी भुजंग पिंटू कोठुळे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे कोठ्याच्या छतावरील पत्र्यांवर मोठे दगड कोसळले. यात काही जनावरे जखमी झाली असून काही जनावरांना मुक्का मार लागल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने कोठुळेंचे कुटुंब थोडक्यात बचावले असून मोठी जीवितहानी टळली.
या घटनेत शेतकऱ्यांच्या शेडचे मोठे नुकसान झाले आहे. ब्लास्टिंग करताना कोणतीही सुरक्षितता न पाळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. संबंधित ब्लास्टिंग ठेकेदार व चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करीत आहेत.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा