हिंगोली जिल्ह्यातील ५८ सराईत गुन्हेगारांना तडीपार; पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांची कठोर कारवाई
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
02जून2026
हिंगोली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, अवैध धंदे करणारे तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांविरुद्ध हिंगोली पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करत तब्बल ५८ गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अन्वये जिल्ह्यातून तडीपार केले आहे. नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेत ही कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, अवैध दारू विक्रेते, जुगार-मटका व्यवसायिक तसेच मालमत्तेविरुद्ध आणि शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विविध पोलीस ठाण्यांनी अशा गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर केले.
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील १२, हिंगोली शहर ११, औंढा नागनाथ ७, सेनगाव ७, हट्टा ६, कुरुंदा ६, बासंबा ५, आखाडा बाळापूर २ आणि नर्सी नामदेव २ अशा एकूण ५८ सराईत गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित आरोपींकडून सातत्याने गुन्हे घडत असून त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यांच्या गुन्हेगारी हालचालींमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण होत असल्याने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगोली ग्रामीण, हिंगोली शहर आणि वसमत यांनी सविस्तर प्राथमिक चौकशी करून संबंधित आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची शिफारस पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर सर्व प्रकरणांची तपासणी करून पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अंतर्गत अधिकारांचा वापर करत आरोपींना विविध कालावधीसाठी हिंगोली जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले. या आदेशांनुसार काही आरोपींना एक महिना तर काहींना एक वर्षापर्यंत जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
तडीपार झालेले खालील प्रमाणे नावे
पोस्टे नर्सी नामदेव हद्दीतील ०१) संतोष पि. नारायण इंगोले ०२) श्याम नारायण इंगोले रा. जवळा बु. ता. सेनगाव जि. हिंगोली पोस्टे औंढा नागनाथ हद्दीतील ०१) पुंजाजी बबन जोगदंड वय २५ वर्ष ०२) नागेश उर्फ नागोराव अशोक पावडे वय २४ वर्ष ०३) कृष्णा काशीनाथ ढोबळे वय १८ वर्ष सर्व रा. असोला ता. औंढा नाग. जि. हिंगोली ४) बालाजी नारायण वानखेडे वय ४२ वर्ष ५) माधव किसनराव वानखेडे वय ४७ वर्ष दोघे रा पुर ता. औंढा नागनाथ जि हिंगोली ६) केशव खुशाल रिठे वय ३२ वर्ष ७) शंकर रामराव रिठे वय ३४ वर्ष दोघे रा पिंपळदरी ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली पोस्टे हिंगोली शहर हद्दीतील १) शिवाजी पंडीत बांगर वय ३२ वर्ष रा वंजारवाडा हिंगोली ता जि हिंगोली २) शेख शफिक शेख रफिक वय ३५ वर्ष रा महादेववाडी हिंगोली ता जि हिंगोली ३) गजानन शिवाजी गुट्टे वय ३३ वर्ष रा मंगळवारा बाजार हिंगोली ता जि हिंगोली ४) शेख इरफान शेख हबिब वय ३६ वर्षरा महादेववाडी हिंगोली ता जि हिंगोली ५) दशरथ उर्फ बबन रामा यादव वय ४० वर्ष रा रिसाला बाजार हिंगोली ता जि हिंगोली ६) शिवाजी रामराव काळे वय ४७ वर्ष रा गवळीपुरा हिंगोली ता जि हिंगोली ७) कन्हैया सिद्राम छिल्लेवाड वय ५३ वर्ष ८) सिध्दार्थ सुदाम भिसे वय ३२ वर्ष ९) शंकर चंपती काळे वय ४४ वर्ष १०) अनिता शंकर काळे वय ३७ वर्ष ११) पवन जयप्रकाश यादव वय ३८ वर्ष सर्व रा रिसाला बाजार हिंगोली ता जि हिंगोली .
पोस्टे हिंगोली ग्रामीण हद्दीतील ०१) बेबीताई साहेबराव पवार वय ६० वर्ष रा सिध्दार्थनगर हिंगोली २) बाबाराव राजाराम लिंबुळे रा पांगरी ३) यशवंत संभाजी वाढवे वय ६० वर्ष रा पिंपरखेड ४) सदाशिव शिवराम खोरणे वय ४५ वर्ष रा नवखा ता जि हिंगोली ५) तोलाजी तुकाराम कऱ्हाळे वय ६८ वर्ष रा डिग्रस कहऱ्हाळे ता जि हिंगोली ६) शंकर प्रभु देवकर वय ३६ वर्ष ७) दिगांबर प्रभु देवकर वय ३८ वर्ष सर्व आनंदनगर बळसोंड ता जि हिंगोली, ८) विठ्ठल तानाजी माने वय ५० वर्ष रा दाटेगाव ता. जि. हिंगोली ९) महादेव जयवंता वाबळे वय ४० वर्ष रा साटंबा ता जि हिंगोली १०) अर्चना दिनेश पवार वय ४० वर्ष रा कलगाव ता जि हिंगोली ११) सुरेश रामा जाधव वय ३८ वर्ष रा मस्तानशहानगर हिंगोली ता जि हिंगोली १२) कन्हैयालाल दर्शनलाल जैस्वाल वय २६ वर्ष रा भोसी ता औंढा ना. जि हिंगोली.
पोस्टे हट्टा हद्दीतील १) दिलीप रामकिशन सवंडकर वय ३७ वर्ष रा टेंभुर्णी ता. वसमत जि. हिंगोली २) बालाजी शशीराव कदम वय ३० वर्ष, ३) गजानन शेषराव कदम वय २७ वर्ष दोघे रा हयातनगर ता वसमत जि हिंगोली ४) अमोल दगडु खिल्लारे वय २९ वर्ष रा परळी दशरथे ता वसमत जि हिंगोली ५) माधव काळोबा काळे वय ६० वर्ष रा हयातनगर ता वसमत जि हिंगोली ६) संजय भिमराव खाडे वय ४१ वर्ष रा हट्टा ता वसमत जि हिंगोली पोस्टे बासंबा हद्दीतील १) बाबासाहेब दत्तराव गडदे वय ५५ वर्ष २) कपिल बाबासाहेब गडदे वय ३८ वर्ष दोघे रा खेर्डा ता जि हिंगोली ३) शेख हारुन शेख सजन वय ४२ वर्ष ४) शेख असलम शेख मुसा वय २२ वर्ष ५) शेखअलताफ शेख मुसा वय २० वर्ष सर्व रा. पारडा ता. जि. हिंगोली पोस्टे सेनगाव हद्दीतील १) गणेश कैलास मगर वय २३ वर्ष २) ऋषिकेश सुभाष डांगे वय २३ वर्ष ३) बालाजी प्रल्हाद मगर वय ४० वर्ष ४) आशिष सदाशिव मगर वय २१ वर्ष ५) कृष्णा कैलास मगर वय २१ वर्ष ६) शिवशंकर हिम्मत मगर वय २० वर्ष ७) विशाल उर्फ नारायण गजानन गवळी वय २४ वर्ष सर्व रा. वरुड चक्रपाण ता. सेनगाव जि. हिंगोली पोस्टे कुरुंदा हद्दीतील १) नामदेव भाउराव पोटे वय ३९ वर्ष रा सिरळी ता वसमत जि हिंगोली २) कैलास शेषेराव वानोळे वय ४२ वर्ष रा खांबाळा ३) यशवंत अंबादास गायकवाड वय ६० वर्ष रा दाभडी ता. वसमत जि. हिंगोली ४) सुदाम बाबुराव कऱ्हाळे वय ३३ वर्ष रा परजना ता. वसमत जि. हिंगोली ५) बाबुराव विश्वनाथ हिवाळे वय ५२ वर्ष व सदस्य ६) गजानन नारायण जामगे वय ४५ वर्ष दोन्ही रा. पुयणी बु. ता. वसमत जि. हिंगोली पोस्टे आखाडा बाळापुर हद्दीतील ०१) शिवशंकर नारायण सुर्यवंशी, वय ५० वर्ष रा. शेवाळा ता. कळमनुरी जि. हिंगोली ०२) गजानन कामाजी बनसोडे वय ता. कळमनुरी जि. हिंगोली
दरम्यान, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पोलिसांकडून ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ आणि ‘ऑलआऊट ऑपरेशन’ नियमितपणे राबविले जात आहेत. सराईत गुन्हेगारांवर सतत नजर ठेवून त्यांच्याविरुद्ध आवश्यक त्या प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात असल्याचे पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी स्पष्ट केले आहे.
या कठोर कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा