हिंगोली तिसऱ्या अपत्यामुळे नगरसेविकेला ठरविले अपात्र जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आदेश

 हिंगोली तिसऱ्या अपत्यामुळे नगरसेविकेला ठरविले अपात्र

हिंगोली : कायद्यात विहित केलेल्या
दिनांकानंतर तिसरे अपत्य असल्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजीत पवार गट) नगरसेविका रुबिना मोहम्मद वाजीद यांना नगरसेविका पदावरुन अपात्र ठरविण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी २३ जून रोजी काढला आहे.

येथील सय्यद ताहेर सय्यद नासेर अली जुलाह यांनी अॅड. अविनाश बांगर यांच्यामार्फत नगरसेविका रुबिना मोहम्मद वाजीद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सुनावणी घेतली. यावेळी वैद्यकीय पुरावे, नगर परिषदेचे अभिलेखे तपासले. त्यानंतर २३ जून रोजी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी आदेश काढला आहे. त्यात रुबिना मोहमद वाजीद यांना कायद्यात विहित दिनांकानंतर तिसरे अपत्य झाल्याने ते महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १६ (१) (के) अन्वये सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरतात. त्यांचे सदस्य पद रिक्त झाल्याचे घोषित करण्यात येत आहे असा आदेश दिला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने