दुसऱ्या कारची नंबर प्लेट लावून कारचा वापर; चालकाविरुद्ध गुन्हा दाखलपोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे

दुसऱ्या कारची नंबर प्लेट लावून कारचा वापर; चालकाविरुद्ध गुन्हा
आरोपी अटक  
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
औंढा नागनाथ, दि. 26 जून : औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसऱ्या वाहनाची नोंदणी क्रमांकाची (नंबर प्लेट) वापरून कार चालविल्याप्रकरणी एका चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद मुरलीधर कपाटे (वय 32, रा. आसोला, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) याच्याकडे असलेल्या स्विफ्ट डिझायर कारवर दुसऱ्या वाहनाचा एमएच-12-क्यूजी-6310 हा नोंदणी क्रमांक लावून वाहनाचा वापर केल्याचे उघड झाले. संबंधित कारचा चेसीस क्रमांक MA3FJB1001884693 व इंजिन क्रमांक D13A-3395605 असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
20 जून 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजल्यापासून ते 25 जून 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत नांदेड परिसरात या वाहनाचा वापर करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तपासादरम्यान 26 जून 2026 रोजी सकाळी 9.27 वाजता संबंधित वाहन ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक तपासात, आदिनाथ रंगनाथ काळे (रा. आजरसोंडा) यांच्या मालकीच्या कारचा नोंदणी क्रमांक आरोपीने स्वतःच्या वाहनावर लावून वापर केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे स्वतःवर होणारी दंडात्मक कारवाई टाळणे, स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणे, मूळ वाहनमालकाचे नुकसान करणे तसेच शासनाची फसवणूक करण्याचा उद्देश असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार वसंत विठ्ठलराव चव्हाण  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. 522/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अय्युब शेख करीत असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने