हिंगोलीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याची तक्रार

हिंगोलीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याची तक्रार

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. ५ जुलै : हिंगोली शहरातील सुराना नगर,  येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून अभ्यासासाठी मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून बाहेर पडली. मात्र ती परत न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती मिळाली नसल्याने अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार राजू शामराव सावंत (वय ३९, रा. सुराना नगर, कारवाडी, ता. जि. हिंगोली) यांनी त्यांच्या मेव्हण्यासह रावसाहेब सोपनराव धवसे (रा. लोहरा बु., ता. औंढा नागनाथ) यांच्या उपस्थितीत ही प्रथम माहिती दिली आहे.
तक्रारीनुसार, राजू सावंत हे पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली येथे अंशकालीन सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची  (वय १३ वर्षे १० महिने १२ दिवस) ही कारवाडी येथील पवित्रेश्वर विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे.
दि. २ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता मुलीने  आईला "मैत्रिणीकडे अभ्यासासाठी जात आहे" असे सांगून घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतली नाही. राजू सावंत हे सकाळी कामावर गेल्यानंतर दुपारी घरी परतले असता मुलगी घरी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पत्नीने ती मैत्रिणीकडे गेल्याचे सांगितले.
रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने सावंत दाम्पत्याने संबंधित मैत्रिणीच्या घरी जाऊन चौकशी केली. मात्र, संबोधी त्या दिवशी मैत्रिणीकडे आलीच नसल्याचे समोर आले. त्यानंतर परिसरात, नातेवाईकांकडे तसेच विविध ठिकाणी तिचा शोध घेण्यात आला. अनेक ठिकाणी संपर्क साधूनही मुलीचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याने अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे.
तक्रारीच्या आधारे हिंगोली ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत असून मुलीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत.
बेपत्ता मुलीचे वर्णन :
वय : १३ वर्षे १० महिने १२ दिवस
उंची : सुमारे ५ फूट
रंग : गोरा
चेहरा : उभा
केस : काळे, लांब
भाषा : मराठी, हिंदी
शिक्षण : इयत्ता १० वी
अंगावरील कपडे : निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पँट
पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित मुलगी आढळल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
असे आवाहन पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी केले आहे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने