मजुरांना घेऊन जाणारे वाहन ट्रॅक्टरला धडकले, अपघातात एकाचा मृत्यू तर सात जख मी
औंढा नागनाथ तालुक्यातील आडगाव रंजेबुवा फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या ढवूळगाव पाटीजवळ विट भट्टीवरील मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाने ट्रॅक्टरला धडक दिल्याने अपघात झाला. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील आडगाव रंजेबुवा फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या ढवूळगाव पाटीजवळ बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मालवाहू वाहन ट्रॅक्टरवर आदळले. यात वाहनातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण परळी येथे वीट भट्टीच्या कामासाठी जात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मृत व जखमींची नावे कळू शकली नाहीत.
टिप्पणी पोस्ट करा