हिंगोलीत विवाहित तरुणीने हॉटेल गणेशन इन लॉजमध्ये घेतला गळफास मेसेज केल्यामुळे घटना आली उघडकीस


विवाहित तरुणीने   हॉटेल गणेशन इन लॉजमध्ये घेतला गळफास  मेसेज केल्यामुळे घटना आली  उघडकीस 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
14सप्टेंबर 2024 
हिंगोली शहरातील एका लॉजमध्ये रिसोड जि. वाशीम येथील विवाहित तरुणीने  गळफास घेऊन
आत्महत्या केल्याची घटना शनिवारी 14 सप्टेंबर रोजी  सायंकाळी उघडकीस आली 
आहे. घटनास्थळी जाऊन 
 हिंगोली शहर पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यला दिली  असून   आत्महत्येचे नेमके कारण समजू 
 शकले नाही 

पोलीस निरीक्षक नरेंद्र पडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील गंगापूर येथील नंदिनी विरेंद्र तिवारी हिचा विवाह दोन महिन्यापुर्वीच रिसोड (ता. वाशिम) येथील प्रतिक करवा यांच्या सोबत झाला होता. काही दिवसांपुर्वीच निकीता ह्या हिंगोली येथे तिच्या  बहिणीकडे राहण्यासाठी आली होती 

आज सकाळपासूनच ती घरातून निघून गेल्याने बराच वेळ होऊनही ती परत आली नसल्याने तिच्या  कुटुबियांनी त्यांचा शोध सुरु केला होता.
 काही वेळानंतर नंदिनीच्या  भावजीच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यामध्ये तिने शहरातील हॉटेल गणेश इन  लॉजमधील रुम नंबर 102 मध्ये असल्याचे नमुद केले. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी लॉजवर जाऊन पाहणी केली असता नंदिनीचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.होता
 या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक सुरेश दळवी, पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहायक  पोलीस निरीक्षक गणपत जाधव  सहायक  पोलीस निरीक्षक  आनंद बनसोडे  जमादार अशोक धामणे, संभाजी लकुळे, , संजय मारके. गणेश लेकुळे 
 यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांनी नंदिनी यांच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरु केली असून त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी
नंदनीचा  मृतदेह सामान्य रुग्णालय येथे पोस्टमार्टम करण्यासाठी दाखल करण्यात आला 

दरम्यान घटनेची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे  पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी महाराष्ट्र24 न्यूजला बोलताना  सांगितले
 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने