अवैध दारूविक्रेत्यांना पोलिस अधीक्षकांनी दिला दंडूक्याचा प्रसाद

अवैध दारूविक्री करतांना आढळल्यास जिल्हयातुन हद्दपार करणार,(If found selling illegal liquor, he will be deported from the district.)

हिंगोली :-  जिल्ह्यातील तेराही ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूविक्री करणार्या व दारू विक्री चे गुन्हे दाखल असलेल्या दोन महिलांसह  56 आरोपींना पकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या समोर मंगळवारी हजर केले होते या गुन्हेगारांना कलासागर यांनी सिंघम स्टाईल दंडूक्याचा प्रसाद देत जिल्ह्यात अवैध दारूविक्री करतांना आढळून आल्यास जिल्हयातुन हद्दपार करण्याची तंबी दिली आहे

पोलिस अधीक्षकांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध दारूविक्री सोबत अवैध व्यवसाय चालकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस अधीक्षक राकेश कलासागर
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर

विश्वसनीय सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार 

जिल्ह्यात मागील काही वर्षांपासुन आणि लाँकडाऊन काळात चोरी छूपे अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. याशिवाय ड्राय डे ला ही जिल्ह्यात खुलेआम अवैध दारूविक्री सुरू आहे ज्यांच्यावर सर्वच ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले आहेत. अवैध दारूविक्री चे गुन्हे दाखल असलेल्या 56 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या समोर हजर केले असता सदर आरोपींना पोलिस अधिक्षक कलासागर यांनी दंडूक्याचा प्रसाद देत पुन्हा अवैध दारूविक्री करतांना आढळून आल्यास जिल्हयातुन हद्दपार करण्याची तंबी दिली. पोलिस अधिक्षकांच्या सिंघम स्टाईल ने अवैध दारूविक्रेत्या बरोबरच ठाणेदारांचे ही धाबे दणाणले आहेत.

पोलिस अधीक्षक योगेश कुमार रुजू झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर अंकुश बसवला होता पण काही ठाण्या अंतर्गत गाव व शहरामधे चोरी छुपे अवैध धंदे सुरूच होते. पोलिस अधिक्षक योगेश कुमार यांच्या बदलीनंतर नुतन पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी पदभार घेताच सुरूवातीला जिल्हातील गुन्हेगारीचा आढावा घेत सुरूवातीला जिल्ह्यातील चोरी, घरफोडीतील गुन्हेगारांना बोलावून चांगलाच चोप दिला होता,

त्यानंतर आज जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना हजर करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यावरून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटिल उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्यासह पथकाने जिल्हाभरातील सुमारे ५6 पेक्षा अधिक गुन्हेगारांना पोलीस अधीक्षकांन समोर हजर केले.

त्यानंतर पोलीस अधीक्षक कलासागर यांनी या गुन्हेगारांची चांगलीच हजेरी घेतली. या गुन्हेगारांची चांगली धुलाई करत जिल्ह्याभरात अवैध दारू विक्री करतांना आढळून आल्यास जिल्ह्यातुन हद्दपार करीन अशी तंबीही दिली. ज्यामुळे अवैध व्यवसाय चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने