हिंगोलीत दोन गटात हाणामारी, परस्पर तक्रारीवरून ६१ जणावर गुन्हे दाखल
घटनास्थळी पोलिस अधीक्षक कलासागर यांनी केली पाहणी
हिंगोली : रिसालाबाजार येथील दोन गटातील हाणामारी प्रकरणात परस्पर तक्रारीवरून ६१ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे . पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे .
शहरातील रिसालाबाजार येथे बुधवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे . याप्रकरणात एका गटाने केल्या दगडफेकीमध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले असून एक कार देखील फोडण्यात आली आहे . अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे , पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे , सहाय्यक पोलिस निरीक्षक शहारे , उपनिरीक्षक कांबळे , जमादार शेख शकील , गजानन होळकर , सुधीर ढेंबरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली .
संजय डहाळे यांनी गुरुवारी दिलेल्या तक्रारीवरून शेख नुमान इब्राहिम , शेख सलमान शेख महेबुब , शेख अल्ताफ शेख अजिस , शेख आवेस शेख अजिस , शेख सलमान शेख इब्राहिम , शेख साहिल शेख लालवाले , सय्यद युसुफ सय्यद आयुब , अमिन पठाण बिस्मीला पठाण , सय्यद वसीम सय्यद करीम , शेख फैजान शेख मोहिद , सय्यद अमिर सय्यद मोईन , शेख आदिल शेख अजीज , सय्यद अक्रम सय्यद मोईन , मोहम्मद इरफान दुल्हा , इम्तीयाजखान पठाण , फरदीनखान पठाण व इतर ४० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे . तसेच शेख नुमान यांनी दिलेल्या तक्रारीवरून चेतन होकरणे , आकाश डहाळे , योगेश होकरणे , अभी होकरणे , अरुण कहार व इतर पाच जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . पोलिसांनी धरपकड मोहिम करून 9जणांना ताब्यात घेतले आहे .
टिप्पणी पोस्ट करा