पत्रकार विकास दळवी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात
हिंगोली - ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्हाभरातील गावागावात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. गावाच्या कानाकोपऱ्यात, चावडी , कट्ट्यावर निवडणुकीच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करून आता प्रचारासाठी आता जोरदार कंबर कसली आहे. आता पत्रकार विकास दळवी देखील आजेगाव येथून वॉर्ड क्रमांक एक मधून प्रस्थापिता विरुद्ध दंड थोपटले असल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे.
अनेक उमेदवारांना सरपंचपदाचे वेध लागले आहेत. असे असताना हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील रहिवासी तसेच हिंगोली जिल्ह्यात नामांकित व सर्वदूर परिचित असलेले, विविध माध्यमाच्या माध्यमातून, पत्रकारिता करून न्याय मिळवून देणारे विकास दळवी हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पत्रकार विकास दळवी यांनी आजेगाव येथील वार्ड क्रमांक एक मधून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंत विविध बातम्याच्या माध्यमातून विकास दळवी हे नव्या क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या,तर सामान्य जनतेला त्यांच्याकडून विकासकामे होण्याची मोठी आशा आहे. एकीकडे मात्र विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याचे दबक्या आवाजात ऐकावयास मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा