कुरुंदा पोलिसांची रेती माफिया वर कार्यवाही, चार आरोपीसह टिप्पर ताब्यातहिंगोली / प्रतिनिधीवसमत तालुक्यातील कुरूंदा पोलिस ठाणे हद्दीतील गिरगाव येथील जामा मज्जीद समोर अवैधरित्या अडीच ब्रास वाळूने भरलेला टिप्पर असल्याची गोपनीय माहिती कुरुंदा मिळाली त्यावरून सपोनि सुनील गोपीनवार यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे.गिरगाव परिसरात रेती माफियाचा मागील काही दिवसापासून सुळसुळाट झाला आहे. अवैधरीत्या उत्खनन करून रेती माफिया चढ्या दराने रेती विकत असल्याचे प्रकार वाढला होता . दि ६ रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास अवैधरीत्या रेती घेऊन जाणारे टिप्पर गिरगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावर कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, यशवंत दाबनवाड, संतोष पटवे, गणेश जाधव, गजानन भोपे यांचा पथकाने रेती माफिया चालक-मालकासह चार जणांना ताब्यात घेत ही कार्यवाही केली आहे. हे चारही आरोपी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.यामध्ये सहा लाख रुपयांच्या वर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी शासनाने बंदी केलेला केली अडीच ब्रास वाळू विनापरवाना बेकायदेशीररित्या चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेत कुरुंदा पोलिसांनी कार्यवाही केली आहे आता या कार्यवाहीमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशाने कुरूंदा पोलिस ठाणे हद्दीत अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्यावर तथा अवैध धंदे चालकांची गय केली जाणार नाही असे मत सपोनि सुनील गोपीनवार यांनी सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने