नॅशनल स्टुडंट्स युनियन व लीगल लाईफ 2020 तर्फे संविधान व्याख्यानमालेचे चे आयोजन करून संविधांकर्त्यास कृतिशील अभिवादन..

नॅशनल स्टुडंट्स युनियन व लीगल लाईफ 2020 तर्फे संविधान व्याख्यानमालेचे चे आयोजन करून संविधांकर्त्यास कृतिशील अभिवादन

6 डिसेंबर बाबासाहेबांच्या समस्त अनुयायांचा दुःखाचा दिवस .त्यांनी केलेल्या सर्वात महत्वाच्या कार्याला म्हणजे भारतीय संविधानाला समजून घेण्यासाठी आणी ते जनतेपर्यंत पोचवण्यासाठी नॅशनल स्टुडंट्स युनियन आणी लीगल लाईफ 2020 च्या संयुक्त विद्यमाने 6 डिसेंबर ते 26 जानेवारी पर्यंत 52 दिवस संविधानाच्या विविध पैलु वर प्रकाश टाकण्यासाठी संविधान व्याख्यानमाला आयोजित केली आहे.या व्याख्यानमालेत संविधान तज्ज्ञ,अभ्यासक ,अधिकारी ,न्यायाधीश, वकील ,प्राध्यापक, व्याख्याते,सामाजिक आणी राजकीय व्यक्तिमत्व आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत .

या मौल्यवान व्याख्यानमालेचा लाभ घेऊन संविधान जनजागृती करण्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी असे आवाहन नॅशनल स्टुडंट्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष दादाराव नांगरे तसेच लीगल लाईफ 2020 चे संपादक नागेश अंभोरे यांनी केले आहे .

राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संविधांकर्त्याच्या स्मृतीस कृतिशील आदरांजली करून .कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. संजय खोब्रागडे

संशोधक,  सहयोगी अधिष्ठाता .तसेच 

कार्यकारी परिषद सदस्य ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोनेरे यांच्या हस्ते होईल .

कार्यक्रमाचे संचलन दादाराव नांगरे करतील तर तांत्रिक सहकार्य नागेश अंभोरे करतील .

सदर व्यख्यांनमाला रोज सायं 7 ते 8 या वेळेत फेसबुकवर नॅशनल स्टुडंट्स युनियन चे पेज www.facebook.com/NSUForStudents तसेच लीगल लाईफ 2020 चे www.facebook.com/legallife2020 वर लाईव्ह असणार आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने