अल्पवयीन मुलीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून काही तासातच सहाय्यक पोलीस निरीक्षक मलापिल्लू केली सुटका
रिवाड जाहीर पोलीस अधीक्षक राकेश कलासगर
महाराष्ट्र 24 न्यूज
हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली येथून ज्ञानदेव इंगोले यांच्या 14 वर्षीय मुलीला शेजारी नातेवाईक यांच्या घरी आलेल्या अनोळखी पाहुण्याने काहीतरी अमीष दाखवून अपहरण
होते
याप्रकरणी 23 फेब्रुवारी रोजी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.प्रकरणाची चौकशी बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मलपिल्लू यांनी करीत असताना मुलीचे अपहरण केलेल्या आरोपी महिला व तिचा सहकारी यांची गोपनीय माहिती काढून मागील दोन दिवसापासून सातत्याने नमूद प्रकरणी पोलीस स्टाफ सायबर शाखेतील अंमलदार व गोपनीय खबरी यांचे मदतीने पीडित मुलीचा शोध घेण्याकरिता पोलिसांचे प्रयत्न सुरू होते त्यातच दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आपहरण केलेल्या मुलीला घेऊन आरोपी महिला व तिचा सहकारी मारुती डांगे रेल्वेने नांदेड कडे येणार आहेत.या माहितीवरून सपोनि मल्ल पिल्लू यांच्या पथकाने परभणी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून सदर ठिकाणी तब्बल सात तासात रेल्वे तपासत औरंगाबाद येथून आलेल्या एका रेल्वे मधून अतिशय शिताफीने पोलिसांनी पीडित मुलीस आरोपी महिला व तिचा सहकारी आरोपी पुरुष यांना ताब्यात घेतले फिल्मी स्टाइल ने तब्बल सात तासात रेल्वे तपासून अखेर पोलिसांनी आपहरण कर्त्याच्या ताब्यातून मुलीची सुटका केली व आरोपींना ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता
आरोपींना चार. दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली
सदर कारवाई पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली
सपोनी राजेश मलपिल्लु यांच्या पथकाने केली आहे.. दबंग कारवाईमुळे
मलपिल्लु यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांना रीवाड जाहीर करण्यात आले आहे
असे महाराष्ट्र 24 न्यूज बोलतानी
पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी सांगितले
टिप्पणी पोस्ट करा