हिंगोली जिल्ह्यात एक मार्चपासून आठवडाभर कडक संचारबंदी लागू

हिंगोली महाराष्ट्र 24न्यूज 
27 फेब्रुवारी 2021
 काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 1 मार्च ते दि. 7 मार्च या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी शनिवारी काढले आहेत. 
आज घडीला 232 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हिंगोली शहरासह जिल्हाभरात रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच विना मास्क फिरणार्यांना दंड लावला जात आहे. तरी सुद्धा नागरिक गांभीर्याने घेत नसल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवार दि 1 मार्च सकाळी सात   पासून  7 मार्च रात्री बारा वाजेपर्यंत   संचारबंदी लागू केली आहे.

या काळात केवळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दूध विक्रेते, दूध विक्री केंद्र यांना मुभा देण्यात आली आहे,  या कालावधीत जिल्हयातील सर्व शासकीय / निम शासकीय कार्यालय, बँका केवळ शासकीय कामासाठी चालू राहणार आहेत. परंतु कर्मचारी ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे, या कालावधीत जिल्ह्यातील सर्व धार्मिक  प्रार्थना स्थळे, सर्व शाळा  महाविद्यालय सर्व मंगल कार्यालय, लॉन्स हे बंद राहणार आहेत, या कालावधीत औषधी दुकाने सुरू राहणार आहेत, या कालावधीत पत्रकार व कार्यालयीन कर्मचारी त्याचबरोबर शासकीय कर्तव्य पार पडणारे अधिकारी कर्मचारी, यांना ओळखपत्र बाळगून मुभा देण्यात आली आहे.

सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी
विनाकारण बाहेर फिरू नका असे आवाहन 
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले  आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने