हिंगोलीत आदेशानंतर आतापर्यंत 50 हजार रुपये दंड वसूल

हिंगोलीत मास्क न वापरणाऱ्या नागरिकाकडून  पन्नास हजाराचा दंड वसूल

महाराष्ट्र 24 न्यूज 
22/02/2021

हिंगोली : शहरातील चौकाचौकांमध्ये नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने आज २२ फेब्रुवारी विनामास्क फिरणा-या नागरिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी तसेच श्री अग्रेसन महाराज चौक यासह विविध ठिकाणी प्रशासनाच्या पथकाने सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केली होती. आज सकाळपासून दुपारपर्यंत या नागरिकाकडून पथकाने प्रत्येकी दोनशे रुपये याप्रमाणे तब्बल ५० हजार रुपये दंड आकारला. हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने वीनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर तसेच वाहन चालक व सामाजिक अंतर न पाळणाऱ्यावर धडक कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच प्रशासनाच्या वतीने कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा तसेच सामाजिक अंतर पाळावे असे ध्वनिक्षेपकद्वारे जनजागृती करून आवाहन केले होते. परंतु अनेकजण तोंडाला मास्क बांधीत नसल्याने पथकाकडून आता धडक कारवाई केली जात आहे. आज सोमवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या सूचनेनुसार तहसीलदार पांडुरंग माचेवाड, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे तसेच नगरपरिषदेच्या पथकातील डी. पी. शिंदे, पंडित मस्के यांच्यासह शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने