डॉ. संजीवन लखमावार यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबित करण्याची भामिशक्तीची मागणी
हिंगोली - कोरोना रुग्णाचे आरटिपीसीआर केलेले स्वाब नमुने खाजगी लॅबला पाठविणाऱ्या डॉ. संजीवन लखमावार यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी भीमशक्तीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भीमशक्तीच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले की, संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाच्या नावाखाली सामान्य नागरिकांची पिळवणूक केली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरटिपीसीआर लॅबमध्ये कार्यरत असलेले डॉ. संजीवन लखमावार हे प्रमुख असून , त्यांची परभणी येथे जन परफेकट्ट लॅब आहे.मात्र जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी ,किंवा उच्य
नायालयाची परवानगी न घेता बेकायदेशीर लॅब सुरु केली असल्याचा आरोप करून कोरोना रुग्णाचे
आरटिपीसीआर स्वाब नमुने शासकीय लॅबला न पाठविता आपल्या खाजगी लॅबला पाठवून कोरोनाच्या नावाखाली शासनाचे व सामान्य नागरिकांचे हजारो रुपये स्वतःच्या घशात घालत असल्याचा आरोप करीत खाजगी लॅबला नमुने पाठवून निदान करायचे असतील तर मग जिल्हा सामान्य रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रयोग शाळेचे काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, खाजगी लॅबला स्वाब नमुने पाठवायचे असेल तर सामान्य रुग्णालयातील आरटीपीसीआर
प्रयोगशाळा बंद करा असा आरोप केला आहे.एकीकडे शासनाचा पगार सुरु असतानाही लोकांच्या जीवासी खेळून स्वतःचा व्यवसायाकडे लक्ष आहे. अशा बेशिस्त वर्तन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करून आरटीपीसीआर सेंटरची खातेनिहाय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा येत्या पाच दिवसात भीमशक्तीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भीमशक्तीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे दिला आहे. आंदोलना दरम्यान शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यासयाची सर्व जबाबदारी डॉ. संजीवन लखमावार यांच्यावर राहील.
निवेदनावर भीमशक्तीचे मराठवाडा उपाध्यक्ष मिलिंद मोरे, माजी नगरसेवक मिलिंद उबाळे, युवा जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले, प्रमोद कुलदिपके , युवराज ठोके, अविनाश सरकटे, सचिन भालेराव ,सिद्धार्थ भारशंकर, जगन धबडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा