धूलिवंदन व होळीच्या सणाचा बेरंग करसाल तर होईल मोठी कारवाई ठाणेदार मलपिल्लू

धुलीवंदन व होळी सणा चा  
बेरंग करसाल  तर होईल 
बेधडक  कारवाई 

हिंगोली जिल्ह्यातील  पोलीस स्टेशन बासंबा हद्दीतील नागरिकांना याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, येत्या रविवार व सोमवार या दिवशी  होळी व धुलीवंदन हे सण मोठ्या उत्साहात एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करून साजरा होत असतो परंतु सध्या covid-19 या रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पोलीस स्टेशन  हद्दीत व जिल्ह्यात सदर कोवीडचे रुग्ण बरेच सापडत असल्याने होळी व धुलीवंदन हे सण कुठे ही आपण सार्वजनिकरीत्या साजरे न करता आपण आपल्या घरामध्ये व घरासमोर साजरी करावी


 जेणेकरून कोणालाही covid-19 या रोगाचा संसर्ग होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी. आपली व इतरांची काळजी घ्यावी तसेच सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी  यांच्या आदेशाने  जमावबंदी  लागू आहे त्या अनुषंगाने कोणीही पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र  येऊ नये. याची दक्षता घ्यावी आपली व आपल्या कुटुंबाची व आपल्या मित्रांची काळजी घेणे कोणालही कोवीड रोगाचा संसर्ग होवु नये याची आपण काळजी घेवुन आपण प्रशासनास सहकार्य करावे.
रंगाचा बेरंग केल्यास  बेधडक कारवाई करू असे सहायक पोलिस निरीक्षक संदीप  मलपिल्लू यांनी  सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने