हिंगोली जिल्ह्यात लॉक डाऊन जनतेच्या हितासाठी
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
आरोग्य यंत्रणा बळकटीकरण व जनतेच्या हितासाठीच संचारबंदी लागू – जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या कमी करण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात सात दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज 31 मार्च रोजी केले.
संचारबंदीचा जो काही निर्णय घेण्यात आला आहे तो जनतेच्या हिताकरिता घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी यापूर्वी जसे सहकार्य केले होते तसेच सहकार्य या संचारबंदीतही करावे असे जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले. हिंगोली जिल्हा लहान असूनही रूग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार अशा काही सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या नाहीत, शिवाय तशी संभावना देखील नाही. हिंगोली जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्याची जिल्हा प्रशासनाची भूमिका नाही. आरोग्य यंत्रणा बळकटीकरण झाली पाहिजे व रूग्ण संख्या वाढू नये यासाठी लॉकडाउन लागू केला आहे. परंतु रूग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे
असे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी महाराष्ट्र24न्यूज ला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा