हिंगोलीतील गोरेगावात जन्ना मन्ना जुगारावर छापा 23 हजार 850 रुपये जप्त जुगार चालकाच्या मुसक्या आवळल्या

गोरेगावात झन्ना मन्ना जुगारावर छापा, २३ हजार ५८० रुपये जप्त

हिंगोली  -  सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील पथकाने २२ एप्रिलला दत्त मेडीकल जवळील मोकळ्या जागेत झना मन्ना जुगारावर छापा मारुन दहा जणावर गुन्हा दाखल करून  २३ हजार ५८० रुपये जप्त केले आहेत.

या प्रकरणी गोरेगाव पोलिसात किसन जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किसन ज्ञानबा डाखोरे , भगवान रामभाऊ वैरागड , संभाजी आत्माराम मोरे , गजानन आत्माराम वैरागड , कृष्णा वामन कावरखे , सय्यद युसूफ नजीर , संभाजी आत्माराम मोरे , गजानन आत्माराव वैरागड , कृष्णा वामन कावरखे, सय्यद युसूफ नजीर , प्रल्हाद आनंदा गुडदे , संदिप जनार्धन कावरखे , प्रविण राजाराम मोरे , माधव धोंडजी कावरखे यांच्यावर गोरेगाव पोलिसात जुगार व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यांच्याकडुन नगदी २३५८० रुपये जप्त केले आहेत.
यापुढेही मटका गुटखा.   जुगार चालकावर  बेधडक कारवाई करू असे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने