* ट्रकचालकाचे मोबाईल चोरी करणारा आरोपी गजाआड , चोरलेल्या ३३ मोबाईलसह ३ लाख , ८ ९ हजार रूपयाचा मुददेमाल जप्त
हिंगोली जिल्हयात होणा - या चोरीच्या घटनांना प्रतीबंध करून चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत मा पोलीस अधीक्षक श्री राकेश कलासागर साहेब , हिंगोली यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांना योग्य सुचना देवून पोउपनि के.डी.पोटे यांचे अधीपत्याखाली एक विशेष पथक तयार करून गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते . त्याअनुषंघाने स्था.गु.शा.पथक वसमत परीसरात माहीती काढत असतांना गोपणीय माहीती मिळाली की , पो . स्टे.वसमत शहर गुरनं .१४३ / २०२१ कलम ३७ ९ , ३४ भादंवि.मधील मोबाईल हा सराईत गुन्हेगार नामे १ ) कैलाश रमेश शिंदे रा.वसमत २ ) सुनिल संजय खिल्लारे रा.म्हातारगाव चोरला असून त्यांनी इतर इसमाला विकी केला आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाल्यावरून पोलीस पथकाने म्हातारगाव ता.वसमत येथील राहणारा शंसयीत आरोपी नामे १ ) सुनिल संजय खिल्लारे वय २२ वर्षे रा.म्हातारगाव ता.वसमत जि.हिंगोली यास ताब्यात घेवून सदर चोरी संदर्भाने विचारपूस केली असता त्याने सांगीतले की , वसमत येथील कैलास रमेश शिंदे व मी असे दोघांनी अंदाजे 20 दिवसापुर्वी बहीर्जी कॉलेज समोर रोडने रेल्वे पुलाजवळ दोन मुले पायी येत असतांना आम्ही त्याचेजवळीळ रेडमी कंपणीचा मोबाईल त्यांचे खिशातून नजर चुकवून काढून घेतला आहे असे सांगून सदर गुन्हयातील चोरलेला रेडमी कंपणीचा मोबाईल स्वताः जवळून काढून दिला . सदर आरोपीतास स्था.गु.शा.पथकाने विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता सदर आरोपीने सांगीतले की , कैलाश रमेश शिंदे व मी असे आम्ही दोघेमिळून मागील सुमारे एक वर्षामध्ये औंढा ते नदिड जाणारे माहामार्गालगत असणा - या ढाब्यावर मुक्कामी थांबलेल्या ट्रकचे कॅबीनमध्ये जावून झोपलेल्या ट्रक चालक व क्लिनर यांचे बरेच मोबाईल चोरले असून ते आम्ही स्वता : चे आहेत असे सांगुन भेंडेगाव , धामनगाव , चौंढी , शिरड शहापुर , म्हातारगाव येथील इसमांना कमी भावात विक्री केली आहे असे सांगीतल्याने पोलीस पथकाने संबधीत इसमाकडून सदर चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत.अशा प्रकारे स्था.गु.शा.पथकाने एकूण ३३ अॅन्ड्राईड मोबाईल किमती अंदाजे ०३,८ ९ , ००० रू किमतीचे अॅन्ड्राईड मोबाईल जप्त करून टूक चालकाला लुटना - या टोळीचा पर्दाफाश केला आहे . तसेच सदर गुन्हयातील फरार आरोपी नामे कैलाश रमेश शिंदे हा चोरी , घरफोडी , दरोडया खुन खुनासह दरोडा या सारख्या गुन्हयात सराईत असुन त्याचे विरूध्द यापुर्वी सुध्दा पोस्टेला व इतर जिल्यात गुन्हे दाखल आहेत . सदरची कार्यवाही ही मा.पोलीस अधीक्षक हिंगोली श्री . राकेश कलासागर साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री . यशवंत काळे , सहायक पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख , पोलीस निरीक्षक श्री.उदय खंडेराय , यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पोलीस उप निरीक्षक श्री.के.डी.पोटे , एस.एस.घेवारे , सपोउपनि बालाजी बोके , पोह / विलास सोनवणे , भगवान आडे , विठठल कोळेकर , पोना / विशाल घोळ ज्ञानेश्वर सावळे , किशोर सावंत , आकाश टापरे , विठठल ज्ञानेश्व पायघन , सायबर सेलचे पोशि / जयप्रकाश झाडे , सुमित टाले चालक पोना / शेख जावेद यांनी केली आहे .
टिप्पणी पोस्ट करा