कनेरगाव नाका हिंगोली राज्य रस्त्यावर कंटेनरला आग लागून कंटेनर मधील साहित्य जळून खाक
कनेरगाव नाका
कनेरगाव हिंगोली राज्य महामार्गावर असलेल्या माळहिवरा गोरेगाव टी पॉईंट जवळ आज दिनांक अकरा रोजी सकाळी आठ वाजता कनेरगाव वरून हिंगोलीकडे जाणारा कंटेनर क्रमांक केजे 25 94 36 या क्रमांकाच्या कंटेनरला मागच्या बाजूला आग लागल्याने आगीचा भडका जास्त जोरात सुरू होता कंटेनरला आग लागल्याचे दिसतात ट्रक चालकाने प्रसंगावधान बाळगून ट्रक चालक व किन्नर दोघेही केबिनच्या बाहेर सुखरूप पडले या घटनेची माहिती हिंगोली अग्निशामक दलास मिळाल्याने अग्निशामक दल काही वेळात घटनास्थळी हजर झाले अग्निशामक दलाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवून कंटेनर मधील मालाचे जळून मोठे नुकसान झाले आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या कंटेनर मधून औषधी गोळ्या व कपड्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली यात नेमकी कुठली व कोणती औषधी आहेत याबाबत माहिती मिळू शकली नाही भर रस्त्यावर लागलेल्या आगीमुळे या रस्त्यावरील दोन्हीकडे जाणारी वाहने ठप्प झाली होती कंटेनरच्या ड्रायव्हरच्या सावधान ते मुळे जिवित हनी टळली असली तरी कंटेनर मधील मालाचे मोठे नुकसान झाले अग्निशामन दलाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते
टिप्पणी पोस्ट करा