हिंगोली : आजेगावात अवैध दारू विक्री आड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धाड ; 38 हजार 790 रुपयाचा मुद्देमाल जप्त
गोरेगाव पोलीस साखर झोपेत
करवाई साठी एक पाऊल मागे
हिंगोली : जिल्ह्यात कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 30 एप्रिल पर्यंत हिंगोली जिल्ह्यातील देशी, विदेशी ,बियर बार, परवानाधारक दुकाने बंद करण्याचे आदेश काढले असले तरी गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गावात खुलेआम पणे अवैध देशी विदेशी दारु,बियरची अव्वाच्या सव्वा भावात विक्री होत असली तरी याकडे गोरेगाव पोलीसांनी साफ दुर्लक्ष केले असल्याने एकेकाळी परवानाधारक दुकानात मिळणारी देशी, विदेशी दारु आत्ता गावागावात मिळत आहे, आजेगांव येथे अवैध देशी, विदेशी दारु विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली मिळालेल्या गोपनीय माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आजेगावातील डेलीनिडसच्या दुकानावर छापा टाकून देशी विदेशी, इंग्लिश बियर च्या 261 बाटल्या असा एकुण 38 हजार 790 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे जिल्ह्यातील परवानाधारक दुकाने बंद असली तरी जप्त करण्यात आलेला देशी, विदेशी, इंग्लिश दारुचासाठा हा कोणत्या परवानाधारक दुकानातुन अवैध विक्री केला गेला यामुळे हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे
जिल्ह्यात अनेक ठिकाणी देशी विदेशी दारूचे अड्डे
वाढले
टिप्पणी पोस्ट करा