हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा गुणाकार एक मेपर्यंत कडक लॉक डाऊन

*हिंगोली जिल्ह्यात आता एक मे* *पर्यंत संपूर्ण लॉकडाउन....* 
_________________________

हिंगोली जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज नवीन सुधारित आदेश जारी केले आहेत .त्यानुसार हिंगोली जिल्हाभरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे .जीवनावश्यक वस्तू विक्रीचे किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते आशा सर्वच दुकानांवर 25 एप्रिल रोजी दुपारी एक वाजल्यापासून ते 1 मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत .इतर सर्व वस्तू ,साहित्य ,पदार्थ यांच्या घरपोच सेवा देण्यासही पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभामध्ये फक्त कोर्टमॅरेजलाच परवानगी मिळणार आहे. संपूर्ण बंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज दिनांक 24 रोजी जारी केले असून दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारी एक वाजल्यापासून या आदेशांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने