सोनटक्के कुटुंबीयास खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते ७ लक्ष ६० हजारांचा धनादेश सुपूर्द
हिंगोली : वीटभट्टीवर काम करत असतांना विद्युत प्रवाह सुरु असलेली विद्युत वाहिनीची तार तुटून अंगावर पडल्याने पिता -पुत्राचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या परिवाराला उदरनिर्वाहासाठी शासकीय मदत मिळावी याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर सोनटक्के कुटुंबास खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते ७ लक्ष ६० हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला .
नांदेड जिल्ह्यातील बेटसांगवी येथील सोनटक्के कुटुंब वसमत येथे वीटभट्टीवर मागील बऱ्याच दिवसापासून कामास होते . ६ मार्च २०२१ रोजी कौठा रोड येथील वीटभट्टीवर काम करत असताना विद्युत प्रवाह सुरु असलेली विद्युत वाहिनी तुटून पडल्याने प्रवाह सुरु असल्यामुळे काम करणाऱ्या पांडुरंग सोनटक्के व रामदास सोनटक्के या दोघांना विजेचा जब्बर धक्का बसला आणि दोन्ही पिता -पुत्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या घटनेमुळे सोनटक्के कुटुंबातील कमावते हात गमावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती . त्यांना शासन आणि महावितरण यांच्याकडून आर्थिक मदत मिळावी याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार त्यांना प्रत्येकी तात्काळ २० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली होती. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी ३ लक्ष ८० हजार अशी एकूण ८ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते.
त्यानुसार आज खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते मयताच्या पत्नी राणी पांडुरंग सोनटक्के व कांताबाई रामदास सोनटक्के यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्यासह नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार , उपजिल्हाप्रमुख सुनील काळे, तालुकाप्रमुख राजू चापके , महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव , काशिनाथ भोसले, महावितरणचे अभियंता रामगिरवार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या दुर्दैवी घटनेबाबत समजताच गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील यांनी सुद्धा सोनटक्के कुटुंबाची त्यांच्या मूळ गावी बेटसांगवी येथे प्रत्यक्ष भेट घेऊन नातेवाईकांचे सांत्वन केले होते.
टिप्पणी पोस्ट करा