खुन प्रकरणातील फरार आरोपी हिंगोली पोलिसाच्या ताब्यात

*खुन प्रकरणातील आरोपी पॅरोलवर असतांना फरार झाला होता ,पोलीस दलाने विशेष मोहीम राबवत आरोपीला केले अटक*

हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस स्टेशन अंतर्गत खुन प्रकरणात आरोपीला 2012 साली जन्मठेप झाली होती ,आरोपी बबन उर्फ उत्तम केशवराव मस्के रा.पारडा याला न्यायालयाने 2013 साली पॅरोलवर रजा दिली होती, त्या संधीचा फायदा घेत आरोपी 2013 सालापासून आतापर्यंत फरार होता, त्याचा शोध बासंबा पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस घेत होते, परंतु आरोपी शक्कल लढवून ओळख बदलुन पुणे,नाशिक अश्या मोठ्या शहरात राहत होता,तसेच सध्या आरोपी नाव बदलुन पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे,सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार आरोपीचा शोध , पोलीस निरीक्षक उदय खंडेराय,  पो.उपनिरीक्षक शिवसांब घेवारे स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली,बासंबा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार, पोह,वाळे,पोना किशोर कातकडे,पो शि विठ्ठल काळे, सायबर सेल हिंगोली सुमित टाले,यांनी विशेष मोहीम राबवत,  आळे ग्रामीण पोलीस स्टेशन पुणे येथील मधुकर पवार यांचे पथक व उपनगर  नाशिक पोलीस स्टेशन पो.नि.शिंदे यांच्यामदतीने आरोपीला अटक केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने