धान्य चोरी करणारी टोळी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड
चोरी गेलेला एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त
हिंगोली जिल्ह्यातील बासंबा हद्दीतील खानापूर येथील रोडवरील एका दुकानाचे कुलुप फोडून 18 तुरीचे पोते चोरीला गेल्या प्रकरणी बासंबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. पो.स्टे.आखाडा बाळापूर, पो.स्टे.कळमनुरी पो.स्टे. हिंगोली ग्रामीण या ठीकाणी सुद्धा दुकानाचे कुलुप फोडून धान्य चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल होते परंतु गुन्हेगारांचा सुगावा लागत नव्हता , आपण अनेकवेळा पाहिले आहे हिंगोली पोलिसांच्या वतीने अनेक कारवाया करत गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले आहे, मराठवाडा विदर्भात या आरोपींनी धुमाकूळ घातला होता, याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांनी या टोळीला गजाआड करण्याचे आदेश दिले होते, आदेशानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख, पो.नि. उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनानुसार पो.उ.नि.शिवसांब घेवारे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक नेमण्यात आले होते, पो.नि. उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनानुसार पो.उ.नि.शिवसांब घेवारे यांनी विशेष लक्ष देत सायबर सेलच्या माध्यमातून अकोला जिल्ह्य़ात 30 ते 40 घरफोडीचा मुख्य सूत्रधार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या ,मुख्य आरोपी हसन उर्फ ईमी छटटु निनसुरवाले रा.कारंजा याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार आरोपी नामे फेरोजखान जसिमखान पठाण रा. कारंजा व आणखी एक साथीदार रा.कारंजा यांच्या मदतीने हिंगोली ग्रामीण हद्दीतील गंगानगर, खानापूर, कळमनुरी, आखाडा बाळापूर येथील तुर व सोयाबीन चोरल्याची कबुली दिली, या कारवाई मुळे हिंगोली पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे, सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे,सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख, पो.नि.उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनानुसार पो.उ.नि.शिवसांब घेवारे, पो.अंमलदार बालाजी बोके, संभाजी लेकुळे, विठ्ठल कोळेकर, राजु ठाकुर,ज्ञानेश्वर पायघन, आकाश टापरे,प्रशांत वाघमारे,असलम गारवे,जयप्रकाश झाडे,सुमित टाले, इरफान पठाण सायबर सेल हिंगोली पथकाच्या वतीने करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा