समाजवादी पक्षाच्या महिला शहराध्यक्षपदी तारामती जाधव
------------------------------------
ऑटो युनियनच्या शहराध्यक्षपदी सय्यद जुबेर
----------------------------------
समाजवादी पक्षाच्या वसमत तालुका अंतर्गत वसमत येथील शासकीय विश्रामगृहात समाजवादी पक्षाचे वसमत तालुकाध्यक्ष मोहम्मद मोबीन यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश झाला असून समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी जिल्हाध्यक्ष शेख खलील बेलदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वसमत शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी श्रीमती तारामती ताई जाधव यांची निवड करण्यात आली असून अॉटो युनियनच्या शहराध्यक्षपदी सय्यद जुबेर सय्यद इमाम यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी वसमत तालुका प्रमुख महासचिवपदी सय्यद असलम, तालुका उपाध्यक्षपदी शेख गुलाब शेख ताहेर कोषाध्यक्षपदी सय्यद आजम, तर महासचिवपदी शेख अफरोज, दुसऱ्या क्रमांकावर तालुका उपाध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली
यावेळी आगामी नगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन ही बैठक घेण्यात आली असून या बैठकीत वसमत शहरात सर्वत्र पक्षाचे उमेदवार, नगरपालिका निवडणुकीत उभे करावयाचे ठरले आहे. तसेच वसमत तालुक्यातील जनतेच्या प्रश्नावर व अपुऱ्या जीवनावश्यक सुविधांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली असून या प्रश्नांना मार्गी लावण्याचे सुद्धा या बैठकीत ठरले आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सय्यद इमाम, तालुकाध्यक्ष मोहम्मद मोबीन, यासीन खान, शेख अन्सार, शक्ती पठाण, शेख खाजा उपस्थित होते यावेळी वसमत येथील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षातील प्रवेश करणार्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले.
टिप्पणी पोस्ट करा