जिल्हा ग्राहक मंच चा भारतीय जीवन विभागाला दणका

भारतीय जीवन विमा (एल आय सी) कंपनीने 5 लक्ष  रुपये अपघात विमा बेनिफिट व्याजासह द्यावे हिंगोली जिल्हा ग्राहक मंचाचे आदेश..

हिंगोली शहरातील महाविर यंबल याचा म्रत्यु 17/02/2019 रोजी रेल्वे अपघातामध्ये झाला होता व त्यांचा जीवन विमा 5 लक्ष एल आय सी मधे काढला होता, मृत्युनंतर मयताचे वारस पत्नीस 5 लक्ष विमा रक्कम कंपनीने दिले परंतु अपघाती फायदा विमाकंपनीने नाकारला होता. म्हणुन अंजली यंबल ह्यांनी यांनी अँड.  अनिल तोष्णीवाल यांचेमार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचः हिंगोली येथे विमा कंपनी (एल आय सी) विरूध्ध  दावातक्रार करून विमा अपघात फायदा मुळपालीसी किमतीच्या  बरोबर मीळण्याबाबत नुकसान भरपाईचे प्रकरण दाखल केले होते सदर प्रकरणांमध्ये सुनावणीअंती गैरअर्जदार एल आय सी ने अर्जदारास पाचलक्ष रुपये अपघात विमा विमा 9% दराने व्याजासह 45 दिवसात द्यावेत व त्रास व खर्च रू 15000/-  देण्याचे आदेश दिले आहेत व मुदतीमधे रक्कम न दिल्यास वरील रकमेवर अतिरिक्त 2 % व्याज देखील देण्याचे आदेश हिंगोली जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष श्री आनंद बी जोशी साहेब व सदस्य श्री जे  ऐ. सावळेश्वरकर साहेब यांनी पारित केले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने