*हिंगोली येथील चिंतामणी गणपती यंदाही बंद*
लाखो भाविकांचा होणार हिरमोड
शेवटच्या दिवशी फेसबूक लाईव्ह दर्शन
हिंगोली शहरातील प्रसिध्द चिंतामणी गणपतीची नवसाला पावला जातो अशी ख्याती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून चिंतामणी गणपती मंदिर बंद आहे. तसेच या वर्षी देखील मंदीर बंद आहे.
हिंगोली चे खासदार हेमंत पाटील कळमनुरी आमदार संतोष बांगर राम कदम यांच्यासह नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले
चिंतामणी गणपतीच्या दर्शनाला राज्यातून नव्हे तर संपूर्ण भारतातुन भाविक भक्त दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात परंतू कोरोनाचे सावट असल्यामुळे सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात मंदीरे बंद असल्यामुळे भाविक भक्तांना दर्शनाला देखील मुकावे लागत आहे. चिंतामणी ट्रस्टचे अध्यक्ष रमाकांत मिस्कीन, सचिव दिलीप बांगर, सहसचिव सचिन घन , सतिष लोहिया, बद्रीनारायण मुंदडा, मिलिंद राजुरकर तसेच ट्रस्टच्या सदस्यांच्यावतीने भाविक भक्तांना आवाहन करण्यात आले आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी भाविक भक्तांनी कोणीही येवू नये. अनंत चतुर्दशीच्या दिवशी ऑनलाईन दर्शन, आरती कार्यक्रम सर्व भाविक भक्तांसाठी दाखविण्यात येणार आहे.
अशी माहिती सचिव दिलीप बांगर यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा