योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवा हिंगोली जिल्हा समृद्ध होईल- खा हेमंत पाटील.
दिशा कमिटी मिटिंग मध्ये प्रतिपादन; अधिकाऱ्यांना धरले धारेव
हिंगोली: जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती अर्थात दिशा योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास हिंगोली जिल्हा समृद्ध होईल असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले .पीकविमा कंपनी , राष्ट्रीय महामार्ग,आणि महावितरण च्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तातडीने सर्व योजनेची अद्यावत माहिती सादर करून बैठकीला येताना सर्व माहिती घेऊनच यावे असे निर्देश देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
खासदार हेमंत पाटील यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली हिंगोली दिशा अर्थात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती ची
बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी संजय दैने, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पोहरे, दिशा समिती सदस्य खोबराजी नरवाडे, श्रीमती इंदिराबाई राठोड, दिलीप कुंदरगे, माणिकराव झटे, श्रीमती सखुबाई गांजवे, गोविंदराव मुळे, संतोष शेळके,श्रीमती सुनिता मुळे, शिवाजी गावंडे, जि.प. सभापती फकीराव मुंडे,सहसंपर्कप्रमुख डॉ रमेश शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम,उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, उध्दवराव गायकवाड, संदेश देशमुख, तालुकाप्रमुख भानुदास जाधव,राजु चापके,माजी सभापती प्रल्हाद राखोंडे, पंचायत समिती सभापती संतोष खोडके,उपसभापती गोपु पाटील, सुरेश कटकमवार, शिवानंद सुरकुटवार, मयुर मंत्री, यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की,हिंगोली जिल्हा हा विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे .त्यामुळे दिशा समितीमध्ये समाविष्ट असलेल्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे कृषी, पीकविमा, आरोग्य, शिक्षण, ,राष्ट्रीय महामार्ग,रेल्वे महावितरण च्या अधिकाऱ्यांनी अधिक सजग राहून सर्व सामान्य जनतेला सुविधा पुरविल्या पाहिजेत असे ते म्हणाले .आजच्या बैठकीत महावितरण, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि कृषी विभागाशी संबंधित अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले तर थेट महावितरण च्या अभियंत्याला फोनवर सभागृहासमोर कामाबाबत तंबी दिली.तर गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजवण्याचे निर्देश सभागृहाला दिले.सर्व सामान्य जनतेची कामे करताना अधिकाऱ्यांचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार आहे, अकार्यक्षम अधिकाऱ्यांनी आपल्या कामात सुधारणा करून सर्व सामान्य जनतेची कामे प्राधान्याने करावीत असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले. पिकविम्याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारीवरून कृषी विभाग आणि संबंधित पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात सांगितले की,पिकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी,येत्या आठ दिवसात तालुका स्तरावर विमा कंपनीचे कार्यालय सुरू करून स्थनिक लोकप्रतिनिधीला माहिती सादर करा, ७२ तासाच्या आत नुकसानीची तक्रार रद्द करा, पीक पैसेवारी, आणेवारी आणि पीक कापणी चे चित्रीकरण करण्याबाबत समित्या स्थापन करा आणि याबाबत तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.येईल.बैठकीमध्ये स्वच्छ भारत मिशन,सिंचन विहीर योजना, फळबाग लागवड, शेळीपालन, पांदणरस्ते, गोठा योजना, मध्यान भोजन, उज्वला गॅस योजना,भूमीअभिलेख यासह विविध योजनेवर खासदार हेमंत पाटील यांनी प्रभावीपणे चर्चा घडवून आणली.
शासकीय अधिकारी निगरगट्ट असतात याची प्रचिती सर्वसामान्य नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधींना सुद्धा आली आहे बऱ्याचदा दिलेल्या पत्राला उत्तर दिले जात नाही याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले की, लोकप्रतिनिधी ने दिलेल्या पत्राला योग्य वेळेत उत्तर दिले जावे आणि तातडीने त्यावर कारवाई करण्यात यावी.
टिप्पणी पोस्ट करा