बचत गटाच्या माध्यमातून अनेकांचे संसार सुखी झाले खासदार हेमंत पाटील

आज हिंगोली जिल्ह्यामध्ये मा  मा.खासदार श्री हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चालू असलेल्या  दिशा बैठक सर्व विभागाच्या आढावा बैठकी प्रसंगी हिंगोली तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष हिंगोली  तालुक्यातील  9 गटामार्फत तयार करण्यात आलेल्या अन्न प्रक्रिया 13 उत्पादनची 25   किट देऊन सर्व सन्मानिय पदाधिकारी व अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.अनेक शासकीय बैठकांमध्ये पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत होता .सदरच्या पुष्पगुच्छ वर होणारा खर्च हा बचत गटाने तयार केलेल्या उत्पादनावर करून त्या माध्यमातून ग्रामीण महिलांना उपजीविका प्राप्त होईल या उद्देशाने मा.मुख्यकार्यकारी अधिकारी श्री दैने साहेब यांच्या कल्पक विचारातून आलेली संकल्पना या बैठकीपासून सुरू केलेला आहे.मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे मा प्रकल्प संचालक कानवडे ,जिल्हा अभियान व्यवस्थापक जे. व्ही मोडके  यांच्या मार्गदर्शनखाली सदरील किट तयार करण्याचे काम जिल्हा व्यवस्थापक तथा तालुका अभियान व्यवस्थापक श्री राजू दांडगे ,जिल्हा व्यवस्थापक श्री विक्रम सारस्वत ,जिल्हा व्यवस्थापक किरण गुरमे  ,टिम व गटातील महिलांनी यामध्ये रोहिणी गायकवाड,मुक्ता गायकवाड, मंगल जाधव ,रेखा पवार यांनी  केले.
गटाच्या माध्यमातून अनेकांचे संसार सुखी झाले असे
हेमंत  पाटील यांनी महाराष्ट्र 24न्यूजला  बोलतांना सांगितले 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने