हिंगोली येथील व्यक्ती मुंबई येथून ईडीच्या ताब्यात
महाराष्ट्र 24 न्यूज
हिंगोली- येथील रहिवासी असणाऱ्या व शहरातील एका उद्योगपतीचे नातेवाईक असणाऱ्या इसमास अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने चौकशीकरिता मुंबई येथून ताब्यात घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली. परंतु सायंकाळपर्यंत यासंदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
वाशिम- यवतमाळच्या खासदार भावनाताई गवळी यांचे निकटवर्तीय असलेले सईद खान यांची यापूर्वी ईडी मार्फत चौकशी करण्यात आली आहे. याच प्रकरणाच्या अनुषंगाने हिंगोली येथील एका प्रसिद्ध उद्योगपतीचे नातेवाईक असणाऱ्या व्यक्तीस अंमलबजावणी संचलनालयच्या पथकाने चौकशीकरिता मुंबई येथून ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत हिंगोली शहरात सकाळपासून कुजबुज ऐकावयास मिळत होती. तर शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांची नावे देखील अफवेचा माध्यमातून चर्चेला आली होती. यासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळेल अशी माहिती उपलब्ध होऊ शकली नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार ताब्यात घेतलेला व्यक्ती हा हिंगोली येथील रहिवासी असून एका उद्योगपतीचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा