हिंगोलीत चार फुटी रावणाचे दहन साध्या पध्दतीने दसरा साजरा

हिंगोलीत चार फुटी रावणाचे दहन   साध्या पध्दतीने दसरा साजरा

हिंगाेली महाराष्ट्र24 न्युज  प्रतिनिधी
 हिंगोली दसरा महोत्सवाला गेली दिडशे वर्षापासूनची ऐतिहासीक परंपरा आहे. कर्नाटकातील म्हैसूर नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा दसरा महोत्सव म्हणून प्रसिध्दी मिळविली आहे.  हिंगोलीत 51 फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले जाते. पण कोरोना पार्श्वभूमीवर चार फुटाच्या रावणाचे दहन केले जात आहे. शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला.हिंगाेलीचा दसरा म्हैसुरच्या दसऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा महाेत्सव आहे.
येथील रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी दरवर्षी माेठी गर्दी असते. दसऱ्याच्या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत रावण दहन केले जाते. यावेळी आकर्षक विद्युत राेषणाई व फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. मात्र मागच्या वर्षी पासून कराेनामुळे दसरा महाेत्सवावर बंधने आली आहेत. यामुळे साधेपणाने कार्यक्रम हाेत आहेत. येथे दरवर्षी 51 ते 55 फुट उंच रावण तयार करण्यात येताे. शहरातील बाबुलाल बमरुले व त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून रावणाची प्रतिकृती उभारण्याचे काम करतात.
मागच्या वर्षीपासून रावणाची उंची कमी करण्यात आली असून केवळ चार फुट उंच रावण तयार केला केला जात आहे. या वर्षी देखील चार फुट उंच रावण तयार करण्यात आला आहे.  शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता खाकीबाबा मठात मठाचे महंत कमल दास महाराज, खासदार हेमंत पाटील, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, दिलीप बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत रावण दहन करण्यात आले.  गतवर्षीपासून दुसऱ्यावर कोरोनाचे सावट असल्याने बाजारपेठ ठप्प झाली आहे. हिंगोलीकरांना ऐतिहासिक दसरा महोत्सवापासून वंचित राहावे लागत आहे असे  खासदार हेमंत पाटील यांनी महाराष्ट्र 24 न्यूज बोलताना सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने