पक्क्या घरकुलाचे स्वप्न साकार होणे हे सर्व सर्व सामान्याच्या आयुष्यभरासाठी ची आनंदाची बाब खासदार हेमंत पाटील

पक्क्या घरकुलाचे स्वप्न साकार होणे हे सर्वसामान्यांच्या आयुष्यभरासाठीची आनंदाची बाब : खासदार हेमंत पाटील
______________________________________
हिंगोली : सर्वसामान्य माणसापासून ते राजा महाराजापर्यंत सर्वांचे आपले स्वतःचे टुमदार घरकुल असावे असे स्वप्न असते.  हे स्वप्न सत्यात उतरताना होणारा आनंद अवर्णनीय असतो.  तुमचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आमचाही हातभार लागत आहे याचा मला खूप अभिमान वाटतो असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले.
    दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी कळमनुरी येथील नगर परिषदच्या वतीने आयोजित हिंदू हृदयसम्राट शिवसेना सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे उद्घाटन  व पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलाचा ताबा व अंतीम धनादेश प्रदान करण्याच्या सोहळ्यात ते बोलत होते.
    यावेळी व्यासपीठावर माजी खासदार एड. शिवाजीराव माने,  हिंगोली जिल्हा शिवसेना प्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर,  सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे,  युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम,  उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे,  तालुकाप्रमुख सखाराम उबाळे,  नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे,  माजी नगराध्यक्ष बंडू पाटील, माजी पंचायत समिती सभापती गोपू पाटील,  शहर प्रमुख संतोष सारडा,  कळमनुरी  तहसिलदार सुरेखा नांदे,  नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश कोठीकर, इंजिनीयर सविता कुटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी पूर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना घराच्या मालकी ताबा व चाव्या प्रदान केल्यानंतर पुढे बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की,  हिंगोली लोकसभा मतदार संघातील नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी मी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे सतत पाठपुरावा करून हिंगोली लोकसभा मतदार संघातील १० हजार ५०० लाभार्थ्यांसाठी १५८  कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला आहे.  या पुढील काळातही पक्क्या घरकुलापासून एकही सर्वसामान्य नागरिक वंचित राहू नये यासाठी सतत प्रयत्नशील राहून निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार असेही खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले. 
    कळमनुरी नगर परिषदेने सुमारे चार एकर जमिनीवर सुंदर व आकर्षक असे उद्यान तयार करून कळमनुरीवासियांना छान भेट दिली आहे. याचा लाभ आबाल वृद्धांना होईल असेही खा. पाटील म्हणाले.
    यावेळी माजी खासदार एड. शिवाजीराव माने,  आ. संतोष बांगर,  नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, माजी नगराध्यक्ष बंडू पाटील यांचीही समयोचित भाषणे झाली.
     याप्रसंगी  उपनगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख,  हिंगोलीचे नगरसेवक सुभाष बांगर, न.प . कळमनुरी शिवसेना गटनेता आप्पाराव शिंदे, नगरसेवक खाजा बागवान,  नाझीम रिजवी,  अतुल बुर्से,  दादाराव डूरे,  बाबा भाई,  बाळू पारवे,  समद लाला,  सुहास पाटील,  नामदेव कऱ्हाळे,  संभाजी सोनुने,  शेख इलियास,  संजय वाढवे,  राजू संगेकर,  कृष्णा पाटील जरोडेकर,  मारोतराव कदम गुरुजी,  दत्ता माने,  मयूर शिंदे,  शिवराज पाटील,  अनिल भोरे,  अनिल बुर्से,  शिवा शिंदे,  शिवम नाईक,  कांता पाटील,  बबलू पत्की,  विलास मस्के,  जसवंत काळे,  पिंटू गडदे,  रवी शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसेना पदाधिकारी,  नागरिक व घरकुल लाभार्थी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने