तेढ निर्माण करणारे मेसेज फॉरवर्ड करणे पडले महागात**दोघे ताब्यात, गुन्हा दाखल*

*तेढ निर्माण करणारे मेसेज फॉरवर्ड करणे पडले महागात*

*दोघे ताब्यात, गुन्हा दाखल*

हिंगोली- जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज फॉरवर्ड करण्यात येऊ नये असे आवाहन हिंगोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले होते. तरीदेखील अशा प्रकारे तेढ निर्माण करणारे मेसेज व्हाट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माझोड येथील व्हाट्सअप ग्रुपवर रविवारी हे मेसेज फॉरवर्ड करण्यात आले होते.

 हिंगोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी वेळोवेळी आवाहन करत आहेत. तरी देखील दिनांक 14 नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील पोलीस स्टेशन गोरेगाव हद्दीमध्ये माझोड  या गावातील रेणुका माता मित्र मंडळ व्हाट्सअप ग्रुपवर व्हाट्सअप ग्रुप मेंबर महावीर मुरलीधर वराडे रा. रामा कृष्णा सिटी हिंगोली व रमेश शिवराम मुळे  रा. माझोड यांनी वादग्रस्त,जातीय तेढ निर्माण करणारे संदेश पाठवले होते. सदरची बाब सायबर पोलिस स्टेशन हिंगोली यांच्या निदर्शनास आल्यानंतर वादग्रस्त पोस्ट करणारे महावीर वराडे यांना   हिंगोलीतून ताब्यात घेण्यात आले. तसेच रमेश मुळे यांना  माझोड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही ईसमा विरुद्ध पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हिंगोली पोलीसाद्वारे सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की कोणीही सोशल  मीडियाद्वारे (व्हाट्सअप  ,फेसबुक इंस्टाग्राम ) समाजात अशांतता निर्माण करणारे, कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे जातीय तेढ निर्माण करणारे फोटो , व्हिडिओ , मेसेज कुणी प्रसारित करू नये सायबर पोलीस स्टेशन हिंगोली आपल्या सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

           सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक  राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स.पोलीस अधीक्षक यतिष देशमुख, पो.नि. उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसांब घेवारे, उप नि. सायबर पोलीस स्टेशन तथा स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली, श्रीदेवी पाटील , सपोनि पोलीस स्टेशन गोरेगाव यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने