जिल्ह्यातील व्यायाम शाळेची चौकशी करा...!
रवीराज शिखरे पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
हिंगोली -
जिल्ह्यातील व्यायाम शाळेची चौकशी करण्यासाठी रवी शिखरे यांनी मंगळवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून बुधवारी दुसरा दिवस होता. अद्याप क्रीडा विभागाचा एकही अधिकारी उपोषणस्थळी फिरकला नाही.
जिल्ह्यातील व्यायाम शाळेची पडताळणी करावी, या प्रमुख मागणीसह चौकशी समितीत तक्रादार, पत्रकार ,माहिती अधिकार कार्यकर्ता, क्रीडा क्षेत्रातील क्रीडा पट्टूना नियुक्त करावे, व्यायाम शाळेचे बांधकाम न करताच अनुदान उचलण्यास मदत करणाऱ्या अधिकाऱ्यावर लाच लुचपत विभागात गुन्हे दाखल करावेत ,या मागण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
याशिवाय जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले की, जिल्ह्यात सुमारे २८० पेक्षा अधिक व्यायामशाळा पाच ते सात वर्षात क्रीडा विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आल्या आहेत. व्यायाम शाळेना जवळपास सात ते बारा लाखाचे अनुदान वाटप केले आहे.असे असताना जिल्ह्यातील बहुतांश व्यायाम शाळा चालकांनी क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून व्यायाम शाळेचे बांधकाम न करताच निधी हडप केला असल्याचा आरोप करूनव्यायाम शाळेना परवानगी देताना अधिकाऱ्यांची टक्केवारी ठरली असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत वेळोवेळी क्रीडा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय ,शासनाकडे तक्रारी करून देखील केवळ नाम मात्र चौकशी करून अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यात आल्याचे काम झाले.या संपूर्ण प्रकरणात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून क्रीडा अधिकारी यांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी रवी शिखरे पाटील यांनी बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले असल्याने क्रीडा विभागाचे पितळ उघडे पडणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा