अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले.हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

*अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले. स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही*
पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर यांच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून कार्यवाही चालू आहे. त्या अनुषंगाने दिनांक 7 /11/ 2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक हिंगोली शहरात पेट्रोलिंग करीत असताना NTC भागात रेतीची वाहतूक करताना MH - 20- DE- 0731 , हा टिप्पर मिळून आल्याने सदर टिप्पर चालक नामे सुरेश रमेश भोकरे राहणार पारडा तालुका जिल्हा हिंगोली याने सदर टिप्पर मध्ये गोळेगाव तालुका औंढा येथील पूर्णा नदीपात्रातून रेती भरून टिप्पर मालक रामकिसन गर्जे यांच्या सांगण्यानुसार हिंगोली मध्ये विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. तसेच रेती वाहतुकीबाबत कोणतीही रॉयल्टी किंवा परवाना जवळ नसल्याचे सांगितले. त्यावरून अवैध रित्या रेतीची वाहतूक करणारे टिप्पर चालक रमेश भोकरे व टिप्पर मालक रामकिसन गर्जे  यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करणे कामी टिप्पर पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे आणून  हायवा टिप्पर व रेती असा जवळपास 30,00000/- /( तीस लाखाचा)मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही चालू आहे.
             सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक श्री यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री शिवसांब घेवारे, अमलदार शंकर जाधव ,ज्ञानेश्वर पायघन ,प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने