सिद्धीविनायक सोसायटीच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती

सिद्धीविनायक सोसायटीच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती 
हिंगोली (प्रतिनिधी)- येथील सिद्धीविनायक सोसायटी एनटीसी यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. 
एनटीसी परिसरातील छत्रपती शिवाजी राजे उद्यान परिसरात सिद्धीविनायक सोसायटी यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती बुधवार दि.१२ जानेवारी रोजी साजरी करण्यात आली.  यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. श्लोक अंभोरे या चिमुकल्या बालकांने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त केले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष कल्याण देशमुख, उपाध्यक्ष उत्तमराव लोखंडे, संचालक सुखबिरसिंग अलग, संजय भुमरे, गणेश गरड, नरेंद्र रायलवार, योगिता देशमुख, जगजित कौर अलग, मिरा कोरडे, अनिता शिंदे, कमला यादव, कुंता लोखंडे, सुरेखा लोखंडे, वंदना धुत, बलवंतकौर अलग यांच्यासह शिवप्रेमी नागरिक व बालक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने