रांगोळी स्पर्धेत स्वप्ना प्रथम तर द्वितीय दीपाली काकडे
राधा रणवीरचा पुढाकार
नरसी - क्रांती ज्योती सावित्री व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी नरसी येथे बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत स्वप्ना जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांकावर दीपाली काकडे यांना समाधान मानावे लागले.
तालुक्यातील नरसी नामदेव येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, बालविकास प्रकल्प अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत स्वप्ना जाधव प्रथम तर दीपाली काकडे द्वितीय, तसेच स्वरा काकडे यांनी तिसरा क्रमांक पटकावल्याने विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षिका श्रीमती अनुराधा घेणेकर यांनी रांगोळी स्पर्धेचे परीक्षण केले. यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल अंगणवाडी सेविका संगीता खिल्लारे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यसस्वीतेसाठीअयोध्या कीर्तनकार, राधा रणवीर, नाजम, सुनीता, आशा मुक्ता, अनुसया, जया आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा