सिद्धिविनायक सोसायटी मध्ये हळदी-कुंकू : आरोग्य जनसंवर्धन अंतर्गत साबन, हॅन्डवॉश, साडी-चोळी वितरण व कोविड लसीकरण
हिंगोली (प्रतिनिधी)- येथील सिद्धीविनायक सोसायटी एनटीसी हिंगोलीच्या वतीने आरोग्य जनसंवर्धन अंतर्गत यंदाचे मकरसंक्रात निमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमात महिला भगिंनीना वाणात साबन, हॅन्डवॉश, साडी-चोळी देण्यात आली. तसेच कोविड-१९ चे लसीकरण शिबिर हळदी-कुंकूवानिमित्त संपन्न झाले.
मंगळवार दि.१८ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी राजे उद्यान परिसरात सिद्धीविनायक सोसायटी एनटीसीच्या वतीने कोविड नियमावलीचे पालन करुन हळदी-कुंकू संपन्न झाले. हळदी-कुंकूाचे उद्घाटन तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेच पुजन करुन करण्यात आले. कोविड लसीकरण शिबिराचे उदघाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, प्रा.डॉ.किशोर इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हिंगोली पालिकेच्या तसेच शहरातील स्वच्छता कामगार व श्रमिक महिलांना साडी-चोळी व वाण देऊन मकरसंक्रात निमित्त सन्मानित करण्यात आले. हळदी-कुंकूवासाठी योगिताताई देशमुख, कमलाताई यादव, मिराताई कोरडे, अनिताताई शिंदे, जगजितकौरताई अलग, कुंताताई लोखंडे, वंदनाताई धुत, दिपाताई सोनटक्के, सुरेखाताई लोंखडे, प्रज्ञाताई पैठणकर, उज्ज्वलाताई सिरसुलवार, कविताताई मद्दिलवार, सुनिताताई बत्तलवाडीकर, राजश्रीताई क्यादमपुरे, अरूणाताई ठाकरे, सुमनताई घुगे, प्रज्ञाताई मगर आदी महिलाभगिंनी परिश्रम घेतले. कोविड लसिकरण शिबीर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका श्रीमती शारदा मस्के, श्रीवंता बर्गे, सुनिता सुपलकर यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा